मुंबई शहर आणि उपनगरात आजही मुसळधार पाऊस सुरुच आहे. हवामान विभागाने मुंबई परिसरात आज आणि उद्या रेड अलर्ट जारी केला आहे. सोमवारी रात्रीपासून पाऊस सुरु आहे. कांदिवली परिसरात भली मोठी दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. या पावसाचा फटका मुंबईकरांना बसला असून अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. तर, पश्चिम महामार्गावरील डोंगराचा काही भाग कोसळला आहे. त्यामुळे, या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून तात्पुरती ही वाहतूक फाउंटन येथून वळवण्यात आली आहे.
मालाड पूर्व टाइम्स बिल्डिंगच्या समोर असणारा डोंगराचा भाग कोसळला आहे. त्यामुळे, मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली असून रस्त्यावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. तर कांदिवलीजवळ डोंगराचा भाग कोसळून पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मिरारोडहून मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
#MumbaiRain #Maharashtra #Mumbai #Highway #TrafficJam #Sakal #SakalMedia
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.